Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युरोपियन युनियनकडून गुगलला 2.4 अब्ज युरोंचा दंड

युरोपियन युनियनकडून गुगलला 2.4 अब्ज युरोंचा दंड
इंटरनेटवर प्रतिस्पर्धी उत्पादने आणि सेवां डावलून आपल्या उत्पादनाना प्राधान्य दिल्याप्रकरणी युरोपियन युनियनने गुगलला 2.4 अब्ज युरोंचा दंड केला आहे. यामुळे युरापीयन समुदायावर अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टिका करण्याची शक्‍यता आहे.
 
गुगलकडून सुरू असणारा हा प्रकार युरोपियन युनियनच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे इतर कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये गुणवत्ता असूनही सर्च इंजिनवर ती डावलण्यात येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे ग्राहकांच्या फायदेशीर आणि नावीन्यपूर्ण उत्पादने निवडण्याच्या अधिकारात बाधा येते, असे मत समुदायाच्या स्पर्धा नियामक समितीच्या आयुक्त मार्गरेथ वेस्टागेयर यांनी व्यक्त केले. यापूर्वी 2009 मध्ये इंटेल या अमेरिकन कंपनीला 160 कोटी युरोंचा दंड भरावा लागला होता. या कारवाईमुळे गुगलला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विकासाठी इनोव्हेटिव्ह पद्धतीने पैसे उभे करू : मुख्यमंत्री