मुंबईत लवकरच कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कांद्याचे दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले होते. तर सध्या कांदा 40 ते 45 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जाते . बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्याने कांदा अजून स्वस्त होणार होण्याची शक्यता आहे.
पन्नाशी ओलांडलेल्या कांद्याचा भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार बफर स्टॉकमधला 1 लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे.त्यामुळे किरकोळ बाजारात 5 ते 12 रुपये किलोने भाव उतरले आहेत. . हा बफर स्टॉकमधील कांदा महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या स्थानिक बाजारांमध्ये कांदा पाठवण्यात आला होता.
याशिवाय दिल्ली, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, चंदीगड, कोची आणि रायपूर या प्रमुख बाजारपेठांमध्येही पाठवण्यात आला होता,असं बुधवारी केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.