आता सरकार तुमची राहण्याची जागा आणि व्यवसाय करण्याच्या जागेचे डिजीटल ऍड्रेस तयार करेल बिलकुल तसेच जसे तुमची वैयक्तिक ओळखसाठी आधार कार्ड नंबर देण्यात येतो. यासाठी संचार मंत्रालयाने एक पायलेट प्रोजेक्ट सुरू केला आहे. डिजीटल ऍड्रेसमध्ये सहा आकड्यांचा एक ऍड्रेस असेल जो लोकांच्या पत्त्या(ऍड्रेस)ची ओळख बनून जाईल.
सुरुवातीत तीन पोस्टल कोडवर हे काम सुरू करण्यात येत आहे, ज्यात दिल्ली आणि दुसरा नोएडा आहे. पोस्टल ऍड्रेस डिजीटल झाल्यावर हे माहीत पडेल की प्रॉपर्टी कोणाचा नावावर आहे, त्याचा टॅक्स रेकॉर्ड देखील माहीत पडेल आणि हे ही जाणून घेता येईल की त्या प्रॉपर्टीवर वीज पाणी आणि गॅस कनेक्शन आहे की नाही. सरकार हे काम 'मॅप माय इंडिया' नावाच्या कंपनीसोबत मिळून करत आहे.
कसे असेल डिजीटल ऍड्रेस: जर कोणाचा ऍड्रेस 147, पॉकेट XX, 2A,जनकपुरी असे तर याचा डिजीटल ऍड्रेस 8GDTYX या प्रमाणे असेल. जो फारच लहान आणि सोपा असेल. मॅप माय इंडिया या कामासाठी इसरो आणि नॅशनल सेटलाइट इमेजरी सर्विस 'भुवन'ची मदत घेत आहे.