पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने ३३ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे परवडणार्या घरांच्या बांधणीस प्रोत्साहन मिळेल, अशी केंद्र सरकारला आशा आहे. गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे या निर्णयाचा तपशील जाहीर केला. अनुदानासाठी पात्र ठरणाºया घरांचा आकार वाढविल्याने आता ‘एमआयजी’वर्गातील अधिक लोक या योजनेतील घरे खरेदी करू शकतील. त्यामुळे २०२१पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
एमआयजी-१
वार्षिक उत्पन्न : ६ लाख ते १२ लाख रु.
घराचा आकार : आधी कमाल १२० चौ. मी. आता कमाल १६० चौ. मी.
व्याज अनुदान : चार टक्के, अनुदानपात्र गृहकर्ज, मर्यादा : नऊ लाख रु., मिळणारे व्याज अनुदान : २,३५,० ६८ रु.
एमआयजी २
वार्षिक उत्पन्न: १२ लाख ते १८ लाख रु.
घराचा आकार : आधी कमाल १५० चौ. मी. आता कमाल १८० चौ. मी.
व्याज अनुदान : तीन टक्के, अनुदानपात्र गृहकर्ज मर्यादा : १२ लाख रु, मिळणारे व्याज अनुदान : २,३०, १५६ रु. .