लातूर जिल्ह्याला द्राक्षांच्या निर्यातीतून २०१० सालापूर्वी सुमारे ७० कोटी रुपये मिळायचे. यंदा हे उत्पन्न चक्क ०८ कोटीवर येणार आहे. पूर्वी लातूर जिल्ह्यात सुमारे २१०० हेक्टरवर द्राक्षबागा होत्या. यंदा हे क्षेत्र साधारणत: ३५० हेक्टर आहे! २०१० साली लातुरकरांनी पाठविलेली द्राक्षं परदेशातून माघारी आली. रसायनाचा अंश द्राक्षात आढळल्याने ही द्राक्षे नाकारत आहोत असं सांगितले. तेव्हा उत्पादकांना ही द्राक्षं चक्क रस्त्यावर फेकून द्यावी लागली. बाजार घटला, पाऊसमान घटले, मागच्या वर्षी तर चक्क दुष्काळच सोसावा लागला. २०१० पासून शेतकर्यांनी द्राक्ष बागा मोडणे सुरु केले. आज या बागांचा आकार अतिशय कमी झाला आहे. असं असलं तरी सुमारे १२५ द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीसाठी कंबर कसली आहे. ही द्राक्षे निर्यात झाली तर केवळ ०८ कोटींच्या उत्पन्नावर समाधान मानावे लागणार आहे.