सरकारने उशीरा जीएसटी परतावा भरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता अशा करदात्यांना उविसंब शुल्काचा बोजा सहन करावा लागणार नाही. सरकारने जुलै २०२० पर्यंत मासिक व तिमाही विक्री परतावा आणि जीएसटीआर-३ बी कर भरण्यावर विलंब शुल्क केवळ ५०० रुपये निश्चित करण्यात आलं आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे.
केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) निवेदनात म्हटलं आहे की, “जीएसटी करदात्यांना मोठा दिलासा देत सरकारने जुलै २०१७ ते जुलै २०२० पर्यंत जीएसटीआर-३बी कर भरण्यावरील विलंब शुल्क केवळ ५०० रुपये निश्चित करण्यात आलं आहे. यामध्ये अट घालण्यात आली आहे. अट अशी आहे की, जीएसटीआर-३ बी परतावा ३० सप्टेंबर २०२० पूर्वी दाखल करावा.
केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क मंडळाने नमूद केलं आहे की जर कर दायित्व नसेल तर विलंब शुल्क आकारलं जाणार नाही. जिथे कर दायित्व असेल तेथे ३० सप्टेंबर २०२० पर्यंत जीएसटीआर-३ बी रिटर्न भरल्यावर जास्तीत जास्त विलंब शुल्क प्रति परतावा ५०० रुपये आकारले जाईल. सर्व प्रकारच्या व्यवसायिकांना याचा फायदा होणार आहे.