कोल्हापुरात देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचा सर्वर हॅक करत, त्यावर सायबर चोरांनी दरोडा टाकला आहे. या चोरीमध्ये 67 लाख 88 हजार लंपास केले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शाहूपुरीमधील एचडीएफसी बँकेत घडली असून, हा सर्व ऑनलाईन पद्धतीने दरोडा टाकला आहे. या चोरीमध्ये हॅकर्सने 67 लाख 88 हजार गायब केले आहेत. सर्व रक्कम दि. कोल्हापूर अर्बन बँक यांची असून.
कोल्हापूर अर्बन बँकेची दोन खाती एचडीएफसी बँकेमध्ये होती आणि त्यांच्याच खात्यातील ही रक्कम लंपास केली गेली आहे. रक्कम लंपास करण्यासाठी हॅकर्सनी एचडीएफसी बँकेचा सर्व्हर हॅक केला होता. तर इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम ऑनलाइन लुटण्याची कोल्हापुरातील पहिलीच घटना आहे. पोलीस सायबर गुन्हे अन्वेषण विभागाची मदत घेऊन चोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता बँकेवर सुरक्षा यंत्रणा व्यवस्थित करण्याचा मोठा दबाव आहे.