Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना काळात बेरोजगार लोकांसाठी सरकारची स्कीम, 50 टक्के पगार मिळेल

कोरोना काळात बेरोजगार लोकांसाठी सरकारची स्कीम, 50 टक्के पगार मिळेल
, गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (10:25 IST)
कोरोना काळात लाखो लोक बेरोजगार झाले आहे अशात केंद्र सरकारने लोकांच्या मदतीसाठी स्कीम काढली आहे. या लोकांना सरकारकडून 50 टक्के पगार मिळू शकेल. हा फायदा त्या लोकांना मिळू शकेल ज्यांच्या पगारातून पीएफ किंवा ईएसआयचे अंशदान वजा होत आहे.
 
लॉन्च केली ही योजना
सरकारने अलीकडेच एम्प्लॉयी स्टेट इंश्योरेंस ऍक्ट (ESIC Act.) अंतर्गत 'अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना' ची अवधी 30 जून 2021 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या स्कीम अंतर्गत केंद्र सरकारने पेमेंट देखील नोटिफाय केले आहे. नंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत काही सूटसह सब्सक्राइबर्सला 50 टक्के बेरोजगारी लाभ देण्यात येईल. हा फायदा त्या कर्मचार्‍यांना मिळू शकेल ज्यांची 31 डिसेंबरआधी नोकरी सुटली असेल.
 
या प्रकारे करता येईल रजिस्ट्रेशन
अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेचा लाभ घेऊ इच्छित असणार्‍यांना रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. आपण ESIC च्या बेवसाइटवर जाऊन अटल बीमित व्यक्ती कल्‍याण योजनेचा फॉर्म डाउनलोड करू शकता. फॉर्म डाउनलोड करण्यासाठी या लिंकचा वापर करावा. 
https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793e9098d125.pdf
 
फॉर्ममध्ये योग्य माहिती भरून कर्मचारी राज्य विमा निगमाच्या जवळीक ब्रांचमध्ये जमा करवावा लागेल. या फॉर्मसह 20 रुपयांचे नॉन-ज्‍यूडिशियल स्टांप पेपरवर नोटरीद्वारे एफिडेविट देखील द्यावे लागेल. यात AB-1 ते AB-4 फॉर्म जमा करवण्या येईल. याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही परंतू ही सुविधा लवकरच सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेचा फायदा आपण केवळ एकदा घेऊ शकता.
 
1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 दरम्यान ओरिजनल क्राइटेरियाच्या आधारावर सब्सक्राइबर्सला लाभ मिळेल. या काळात बेेरोजगारी लाभ 50 टक्क्यांऐवजी 25 टक्केच मिळणार. या स्कीमचा लाभ संगठित क्षेत्रातील ते कर्मचारी घेऊ शकतात जे ESIC हून बीमित आहे आणि दोन वर्षांहून अधिक काळापर्यंत नोकरीत करून चुकले आहेत. याव्यतिरिक्त आधार आणि बँक अकाउंट डेटा बेस शी जुळणे देखील आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोण आणि श्रद्धा कपूरचा असा झाला खुलासा! व्हाट्सएप चॅट काम आले