Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विकासकामांची वानवा, जाहिरातबाजीवर अमाप खर्च!

विकासकामांची वानवा, जाहिरातबाजीवर अमाप खर्च!
, सोमवार, 31 डिसेंबर 2018 (11:08 IST)
- मोदी सरकारची ५,२४५ कोटींची जाहिरातबाजी
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची मोठी फसवणूक केली. नोटबंदीसारखे निर्णय जनतेवर लादले. #GST ची घाईघाईत अमलबजावणी आणि त्यात सुधारणांचा खेळ सुरूच आहे. थोडक्यात जनहिताची कामे केली नाहीत. पण, तसा आव मात्र आणला. त्यासाठी पुन्हा जनतेचाच पैसा फक्त उधळला. मोदी सरकारने सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी तब्बल ५ हजार २४५ कोटी ७३ लाख रुपये इतकी प्रचंड रक्कम खर्च केली आहे. ही आकडेवारी सरकारकडूनच देण्यात आलेली आहे. निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपाने मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली होती. या जाहिरातबाजीतून सत्ताही त्यांनी मिळवली. मग योजनांच्या नावाखाली कोट्यवधींची जाहिरातबाजी करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, पाणी टंचाईवर उपाययोजना व विकासकामांसाठी हे ५ हजार कोटी रुपये अधिक उपयुक्त ठरले असते, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे’-एमटीडीसीचा पुढाकार