राज्यभरातील सुमारे 64 ज्वेलर्सवर आयकर खात्यानं कारवाई सुरु केली आहे. पुण्यात आणि नाशिकमध्ये काही महत्त्वाच्या ज्वेलर्सवर छापाही घालण्यात आला आहे. यात पुण्यातील 13 ज्वेलर्सची चौकशी करण्यात आली. तसंच नागपूरच्या 9, नाशिकच्या 7 ठाण्यात 5, कल्याणमध्ये 5, सोलापूरमध्ये 5 अकोल्यात 4 ज्वेलर्सवर आयकर विभागानं कारवाई केले आहे.
नोटाबंदीनंतर काळ्याचं पांढरं केल्याच्या संशयातून या ज्वेलर्सची चौकशी करण्यात येत आहे. सोबतच नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर कॅश डिपॉझिट झालेल्या ज्वेलर्सना आयकर विभागानं रडारवर घेतलं आहे. पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या 30 कोटींच्या कॅश ट्रान्झक्शन्सची तपासणीही आयकर खात्यानं केली आहे.यात ज्वेलर्सच्या सर्व अकाऊंट्सची तपासणीही करण्यात आली.