IDFC FIRST बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये बँक 48 दिवसांसाठी ग्राहकांना इंटरेस्ट फ्री कॅश ऍडव्हान्स ची सुविधा देत आहे. आपल्या क्रेडिट कार्ड व्यवसायाला चालना देण्यासाठी बँकेने ही सुविधा जाहीर केली आहे.
बँकेच्या या सुविधेमुळे ग्राहकांना क्रेडिट कार्डवर बिनव्याजी रोख रक्कम मिळण्याची सुविधा मिळणार आहे याशिवाय बँक सेविंग अकाउंट वर वार्षिक सात टक्के दराने ग्राहकांना व्याज देत आहे. बँकिंग क्षेत्रात प्रथमच बँकेकडून इंटरेस्ट फ्री क्रिश ऍडव्हान्स ची सुविधा दिली जात आहे. या फीचरची सध्या टेस्ट केली जात आहे. मात्र लवकरच ही सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाईल.
याशिवाय बँक क्रेडिट कार्ड मध्ये प्रवेश करत आहे नंतर या सुविधांचा विस्तार केला जाईल तसेच इतर बँकांकडून 36 ते 40 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जातील, मात्र प्रतिवर्ष 9 ते 36 टक्के शुल्क असते.
बँक पाच प्रकाराचे क्रेडिट कार्ड बाजारात आणणार आहे ज्यामध्ये मासिक 0.75 पासून दोन 2.99 टक्के म्हणजे 9 टक्के ते 35.88 टक्क्यांपर्यंत वार्षिक राहील.