Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मागील हिशोब न देता कारखाने चालू ठेवले तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

raju shetty
, गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (21:53 IST)
आम्ही जे मागतोय ते हिशोबाने मागतोय… मागील हिशोब पुरा न ठेवता कारखानदार कारखाना चालु ठेवणार असतील तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. या बैठकीला कारखानदारांनी उशीर केल्याने साखर कारखाने वेळेत सुरु होत नाहीत. त्यामुळे हिशेब पुर्ण करा आणि कारखाने चालु करा असे आवाहनही राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
 
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु झाला आहे. पण ऊस दराच्या तोडग्याअभावी अपवाद वगळता सर्व कारखाने बंदच आहेत. साखरेसह अन्य उपपदार्थांना गेल्या वर्षभरात चांगला भाव मिळाल्यामुळे गत वर्षात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 400 रूपयेंचा हप्ता आणि चालू गाळप हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान 3500 रूपये विनाकपात पहिला हप्ता देण्याची सर्वच शेतकरी संघटनांची मागणी आहे. पण कारखानदारांना ही मागणी मान्य नसल्यामुळे संघटना आणि कारखानदारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बैठक आयोजित केली आहे.
 
या बैठकिनंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “आमची मागणी रास्त आहे. आम्ही 400 रूपये हिशोबाने मागतोय. बी हेवी मॉलेसिसपासून इथेनॉल तयार होते असल्याने साखर कारखान्यांची रिकव्हरी कमी होते. त्याचा फटका उस उत्पादकांचा होऊन तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान भरून निघले पाहीजे.” अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
 
पुढे कारखानदारांवर आरोप करताना ते म्हणाले, “या बैठकीला साखर कारखानदारांनी उशीर केला आहे. त्यामुळे वेऴेत कारखाने सुरु होत नाहीत ही जबाबदारी त्यांची आहे. हिशेब पुर्ण करा आणि कारखाने चालु करा अशीच आमची मागणी आहे. मागिल हिशोब पुर्ण न करता कारखानदार कारखाना चालु ठेवणार असतील तर मात्र संघर्ष अटळ आहे.” असेही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजगर, घोरपडी, पाली, सरडे चोरून नेले चोरून नेले ; नेमकं काय आहे प्रकरण?