Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा, धक्का देणारी रक्कम सापडली

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा, धक्का देणारी रक्कम सापडली
विधानसभा निवडणुकां होण्या पूर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये जागावाटपावरून जोरदार विवाद सुरु आहेत. नंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत स्वबळावर लढवत असून, या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना राज्यात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडीं देखील होत आहेत. यामध्ये आयकर विभागाने (आयटी) वंचित बहुजन आघाडीचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका येथील कार्यालयावर अचानक छापा टाकला आहे. मात्र, छापेमारीत अधिकाऱ्यांना फक्त ११०० रुपये सापडले आहेत. 
 
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका कार्यालयावर आयटीने छापा टाकला. या छाप्यात आयटी अधिकाऱ्यांना ११०० रुपये आढळून आले. आयटीच्या अधिकाऱ्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांची कसून चौकशी केली आहे असे वंचित आघाडीकडून स्पष्ट केले गेले. ही कारवाई  सत्ताधारी भाजप-शिवसेना सूडबुद्धीतून करण्यात आली असा आरोप वंचित ने केला आहे. मात्र कारवाई करायला गेले आणि हाती धोपटणे ;लागले अशी गत आयटी अधिकाऱ्यांची झाली तीच चर्चा राज्यात सुरु होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आधार कार्ड हरवले, मग हे वाचा