Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अब्जाधीशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर

अब्जाधीशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर
अब्जाधीशांच्या संख्येच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात एकूण 100 हून अधिक अब्जाधीश असून रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. फोर्ब्स मॅगजीनने जारी केलेल्या नव्या यादीत ही माहिती समोर आली आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत एकूण 2,043 श्रीमंतांनी स्थान मिळवलं आहे. या सर्वांची एकूण संपत्ती गतवर्षीच्या तुलनेत 18 टक्क्यांनी वाढली आहे. 
 
बिल गेट्स गेल्या 23 वर्षांत 18 वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गेट्स यांची संपत्ती 86 अरब डॉलर आहे. गतवर्षी त्यांची संपत्ती 75 अरब डॉलर होती. त्यांच्यानंतर बर्कशायर हॅथवेचे प्रमुख वारेन बफे यांचा क्रमांक आहे. त्यांची संपत्ती 75.6 अरब डॉलर इतकी आहे. अॅमेझॉनच्या जेफ बेजोस यांच्या संपत्तीत 27.6 अरब डॉलरची वाढ झाली आहे. 72.8 अरब डॉलर्सच्या संपत्तीसह ते तिस-या स्थानावर पोहोचले आहेत. पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निलेश राणे यांचा काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा