Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महागाईचा फटका ; 1 जून पासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढणार ?

LPG Gas Cylinder
, मंगळवार, 31 मे 2022 (11:53 IST)
मे महिना संपत आला आहे. आता आपण नवीन महिन्यात म्हणजेच जूनमध्ये प्रवेश करणार आहोत. 1 जून 2022 खास आहे कारण या दिवशी तुमच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी बदलणार आहेत. यापैकी एक एलपीजीची किंमत असू शकते. 
 
दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या एलपीजीच्या किमतीचा आढावा घेऊन निर्णय घेतात. मात्र, गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्याच्या मध्यात एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले. अशा स्थितीत एलपीजीच्या किमती पुन्हा वाढणार का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. 
 
7 मे रोजी घरगुती LPG (14.2 kg) सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली होती. एलपीजी गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग करण्याचे काम तेल कंपन्यांनी केले होते. तेल कंपन्यांच्या या निर्णयानंतर आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1003 रुपयांवर पोहोचली आहे.तर मुंबईत 1005 रुपये आणि कोलकातामध्ये 1029 रुपये आहे. 
19 मे 2022 रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 3 रुपये 50 पैशांनी वाढली. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आठ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 19 मे रोजी देशात घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्याची महिनाभरातील ही दुसरी वेळ होती.

19 मे रोजी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने संपूर्ण देशात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जवळपास 1000 रुपयांच्या पुढे गेली आहे. केंद्र सरकार ने एलपीजी सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याचे  सांगितले. ही सबसिडी एका वर्षात 12 सिलिंडरवर मिळणार आहे. हे अनुदान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच असेल. उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील 9 कोटींहून अधिक महिलांना मोफत LPG सिलिंडर कनेक्शन देण्यात आले.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिद्धू मुसेवाला यांच्यावर अंत्यसंस्कार आज, पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह घरी पोहोचला