Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IRCTC द्वारे आज बुक करा रेल्वे तिकिट आणि पेमेंट करा 14 दिवसांनी...!

IRCTC द्वारे आज बुक करा रेल्वे तिकिट आणि पेमेंट करा 14 दिवसांनी...!
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबरी आहे. IRCTC ने तिकिट बुकिंग अजून सोपे बनवून दिले आहे. या निर्णयानंतर आयआरसीटीसीने आपल्या ग्राहकांसाठी तिकीट बुकींग संदर्भातला एक नवा पर्याय आणला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता रेल्वे तिकीट बुकींगसाठी . IRCTC ने ‘बाय नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा आणली आहे. या सेवेमुळे तुम्ही तिकीटाचे पैसे नंतर पुढील 14 दिवसांमध्ये देऊ शकता. यामुळे तिकीट बुकींग दरम्यान येणा-या लांब पेमेंट प्रोसेसमधून सुटका होणार आहे.
 
ई-पे लॅटरच्या सहयोगाने IRCTC ने ही सुविधा आणली आहे. तिकीट बूक केल्यानंतर 14 दिवसात कधीही पेमेंट करता येईल. यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन पेमेंट करावं लागेल. त्यानुसार तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केल्यास पुढील 14 दिवसांमध्ये तिकीटाचे पैसे पे करू शकाल.
 
‘बाय नाऊ, पे लॅटर’ सुविधेचा वापर करण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅनची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ज्यानंतर तुम्हाला तिकीट बूक करता येईल. दरम्यान यापूर्वीच IRCTC ने तिकिटासाठी कॅश ऑन डिलीव्हरी सेवा सुरु केली आहे. तिकीट बूक केल्यानंतर तुम्ही ते घरी मागवू शकता. त्यानंतर पेमेंट कार्ड किंवा कॅशद्वारे करु शकता.
 
ePaylater नुसार, ही सेवा ग्राहकांसाठी अतिशय फायद्याची ठरेल जी कोणत्याही अडचणीशिवाय तिकीट बुक करेल. कंपनीचं टार्गेट आहे की, पुढील सहा महिने प्रत्येक दिवशी होणारे 6 लाख ट्रान्झॅक्शनमधील 5 टक्के त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून व्हावे. कंपनीने सांगितले की, ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना आपली आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती द्यावी लागेल. ईपेलेटर असा प्लेटफॉर्म आहे जेथे युजर तिकिट बुक करवून लगेचच लॉग आउट करू शकतो, कारण नंतर भुगतानाचे विकल्प येतो.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पतमानांकन संस्थेचा दावा : भारतावर आणखीही मोठे कर्ज