आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता प्रवाशांना क्रेडिटवर तिकिट मिळणार आहे. डिजिटल पेमेंट स्विकार करणारी ही पहिली सरकारी वेबसाइट आता पूर्णपणे कॅशलेस झाली आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला रेल्वेकडून नव्या सुविधेविषयी माहिती देण्यात आली होती. या सुविधेत प्रवासाच्या पाच दिवस आधी तिकिट बुकिंग केल्यानंतर त्या तिकिटाचे पैसे 14 दिवसानंतर देता येणार आहेत.
या सेवेसाठी प्रवाशाकडून ३.५ टक्के सेवाकर घेतला जाईल. या सुविधेसाठी आयआरसीटीसीने मुंबईतील ‘ई-पेलॅटर’ या कंपनीशी सहकार्य करार केला आहे.आयआरसीटीसीच्या या सुविधेमुळे तिकिट बुकिंगच्या वेळी तात्काळ पैसे देण्याची प्रवाशांना आता काळजी करावी लागणार नाही. जर 14 दिवसांनंतर प्रवाशांनी तिकिटाचे पैसे भरले नाहीत तर त्यांना दंड आकारला जाणार आहे.
तसंच जो प्रवासी दरवेळी पैसे भरायला टाळाटाळ करेल, त्याला कायमस्वरूपी आयआरसीटीसीच्या या सेवेपासून वंचित राहावं लागणार आहे.