Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जियोने केले दोन प्लान बंद

जियोने केले दोन प्लान बंद
, शनिवार, 18 जुलै 2020 (15:45 IST)
सर्वांना परवडणारे मोबाईल रिचार्ज जर असतील तर ते रिलायन्स जिओचे. मात्र आता रिलायन्स जिओने आपले दोन स्वस्त प्लान बंद केले आहेत. जिओचे ४९ रुपये आणि ६९ रुपयांचे दोन्ही प्लान कंपनीने बंद केले आहेत. हे दोन्ही प्लान जिओ फोन युजर्ससाठी होते. हे प्लान आता रिलायन्स जिओच्या वेबसाईटवरून हटवण्यात आले आहेत. त्यामुळे युजर्संना आता हे प्लान आता रिचार्ज करता येवू शकणार नाहीत. रिलायन्स जिओने या प्लानला Shorter Validity Plan असं नाव दिलं होतं.
 
४९ रुपये आणि ६९ रुपयांचे हे प्लान नक्की काय होते ते पाहुयात. या दोन्ही प्लानची वैधता १४ दिवसांची होती. दोन्ही प्लानमध्ये वेगवेगळी सुविधा मिळत होती. या प्लानला ५ महिन्यांपूर्वी आणले होते. ४९ रुपयांच्या प्लानमध्ये जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कसाठी २५० नॉन जिओ मिनिट्स आणि २५ एसएमएस मिळत होते. इंटरनेटसाठी ग्राहकांना या प्लानमध्ये २ जीबी डेटा दिला जात होता.
 
६९ रुपयांच्या प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी २५० नॉन जिओ मिनिट्स आणि २५ एसएमएस दिले जात होते. इंटरनेट साठी ग्राहकांना रोज ०.५ जीबी डेटा दिला जात होता. तसेच या प्लानची वैधता १४ दिवसांची होती. त्यामुळे ग्राहकांना या प्लानमध्ये एकूण ७ जीबी डेटा दिला जात होता. दोन्ही प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाची सौम्य लक्षण असेलेल्या रुग्णांना घरी पाठवा’, पुणे मनपाचा निर्णय