Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॅम्बॉर्गिनीची 3.22 कोटींची सुपरकार

लॅम्बॉर्गिनीची 3.22 कोटींची सुपरकार
, शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (15:17 IST)
भारतात Lamborghini ने आपली सुपरकार Huracan Evo RWD लाँच केली आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 3.22 कोटी रुपये आहे. कंपनी ही कार भारतात अगोदरच विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या Huracan Evo ऑल-वील ड्राइव मॉडल आणि Huracan Evo Spder मॉडलसोबत विकणार आहे. या दोन्ही कारची किंमत अनुक्रमे 3.73 कोटी आणि 4.1 कोटी रुपये आहे.
 
Huracan Evo RWDमध्ये 5.2 लिटर व्ही10 पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. या इंजिनमध्ये 610 पीएस पॉवर आणि 560 एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. इंजिनमध्ये 7-स्पीड ड्युअल क्लच गिअरबॉक्स आहे. 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी या कारला फक्त 3.3 सेकंद लागतात असा दावा कंपनीने केला आहे. या कारचा कमाल वेग 325 किमी प्रति तास आहे. 
 
या कारची डिझाईनही अत्यंत आकर्षक आहे. लॅम्बॉर्गिनीने आपल्या नव्या कारमध्ये फ्रंट स्प्लिटर आणि एअर इन्टेक दिला आहे. स्टँडर्ड Huracan Evo पेक्षा वेगळा लूक देण्यासाठी या कारमध्ये वेगळ्या स्टाइलचा रिअर डिफ्युजरही देण्यात आला आहे. शिवाय -pple कार प्ले सपोर्टसह 8.4 इंच टचस्क्रीन एन्फोटेन्मेंट सिस्टम, फुल डिजीटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 19 इंच आकाराचे अलॉय व्हील्स आहेत.
 
कमी वजनाच्या रिअर व्हील ड्राइव्ह लेआऊटमुळे या कारचं वजन इव्होच्या ऑल व्हील ड्राइव्ह मॉडलपेक्षा 33 किलोने की आहे. कारमध्ये लॅम्बॉर्गिनी परफॉर्मन्स ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (P-TCS) व्हर्जन आहे, ज्यात स्ट्राडा, स्पोर्ट आणि कोर्सा ड्राइव्ह मोड आहे. 
 
लॅम्बॉर्गिनीने इतर कारप्रमाणेच या कारमध्येही ग्राहकांना आपल्या आवडीने कस्टमायझेशनचा पर्याय दिला आहे. भारतीय बाजारात या कारची टक्कर फरारीची आगामी एफ8 ट्रिब्यूटो, एस्टन मार्टिन वॅन्टज आणि मर्सिडीझ - MG GT यांसारख्या सुपरकारसोबत होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

NZ vs IND 2nd ODI: केएल राहुल ४ धावांवर बाद