Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेटमध्ये स्टेट बँकेचा मोठा भांडवली हिस्सा

जेटमध्ये स्टेट बँकेचा मोठा भांडवली हिस्सा
नवी दिल्ली , शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (15:17 IST)
कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या जेट एअरवेजला आर्थिक उभारी देण्यासाठी स्टेट बँकेने सुचवलेल्या कर्ज पुनर्मांडणी योजनेला जेट व्यवस्थापनाने मंजुरी दिली. कर्जांचे रूपांतर भागभांडवलात करण्याची ही योजना असल्याने लवकरच जेटमध्ये स्टेट बँकेचा मोठा भांडवली हिस्सा निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
खासगी विमानसेवा कंपन्यांमध्ये एकेकाळी आघाडीवर असणारी जेट एअरवेज सध्या कर्ज व तोट्यामुळे आर्थिक अडचणीत आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँक समूहाने जेटला मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला असल्याने या कंपनीला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी स्टेट बँकच पुढे सरसावली आहे. यासाठी स्टेट बँकेने जेटला कर्ज पुनर्मांडणी योजना सुचवली होती. ही योजना जेटच्या संचालक मंडळाने मंजूर केल्याने जेटधील भांडवलाची पुनर्रचना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
8,500 कोटींची तूट
 
स्टेट बँकेने केलेल्या पाहणीनुसार जेटचे उत्पन्न व खर्च, तोटा, कर्ज यांमध्ये 8,500 कोटी रुपयांची तूट आहे. यामध्ये जेटवर असलेल्या सतराशे कोटी रुपयांच्या कर्जाचाही समावेश आहे. नवीन भांडवल, कर्जाची पुनर्रचना, मालमत्ता विक्री आदी उपायांद्वारे ही तूट भरून काढण्याचा स्टेट बँकेचा प्रयत्न आहे.
 
11.40 कोटी नवे समभाग
 
स्टेट बँकेसह अन्य बँकांच्या कर्जाचे रुपांतर भागभांडवलात करण्यात येणार आहे. यासाठी धनको बँकांना प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याचे 11.40 कोटी समभाग वितरित करण्यात येतील. यामुळे नव्या रचनेमध्ये जेटमधील भांडवली हिश्श्यात स्टेट बँकेचा सर्वाधिक वाटा असेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुलवामामध्ये शहीद जवानांच्या कुटुंबीयांना रिलायंस फाउंडेशनची मदत