Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

LPG Cylinder Price Hike 1st April 2022: LPG सिलिंडर आजपासून 250 रुपयांनी महाग, जाणून घ्या नवीन दर

LPG Gas Cylinder
, शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (09:04 IST)
एलपीजी सिलिंडरची किंमत 1 एप्रिल 2022: आज 1 एप्रिल आहे आणि आजपासून एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. यावेळी महागाईला जोरदार झटका देत तेल आणि पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात एका झटक्यात 250 रुपयांनी वाढ केली आहे. पण एक दिलासा आहे की ही दरवाढ घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये नाही तर व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. 10 दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. यापूर्वी 22 मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट नोंदवण्यात आली होती. 

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 22 मार्चपासून ग्राहकांना महागाईचा झटका बसू लागला. 22 मार्च रोजी अनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये 50 रुपयांची वाढ झाली होती. यापूर्वी 6 ऑक्टोबर 2021 नंतर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आज म्हणजेच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीही, घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीत ९४९.५० रुपये, कोलकात्यात ९७६ रुपये, मुंबईत ९४९.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९६५.५० रुपये आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जम्मू-काश्मीरः पुंछमध्ये कार 300 फूट खोल दरीत पडली; लग्न समारंभातून परतणाऱ्या 9 जणांचा मृत्यू, 4 जखमी