Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मारुती सुझुकीची बॅलेनो स्मार्ट रूपात, किंमत आणि विशेष फीचर्स जाणून घ्या

मारुती सुझुकीची बॅलेनो स्मार्ट रूपात, किंमत आणि विशेष फीचर्स जाणून घ्या
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki) ने अधिक स्मार्ट आणि नवीन फीचर्ससह मारुती बॅलेनो (Maruti Baleno) लॉन्च केली आहे. मारुतीने BS-6 स्टॅंडर्ड पेट्रोल इंजिनसह बॅलेनो सादर केली आहे. मारुती बॅलेनोने त्याची शोरूम किंमत 5.58 लाख ते 8.9 लाख रुपये वाढविली आहे.
 
या व्यतिरिक्त मारुतीने स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानासह सुसज्ज बॅलेनोचे आणखी दोन आवृत्त्या देखील सादर केल्या आहेत. 1.2 लीटर ड्यूलजेट, ड्युअल व्हीव्हीटी पेट्रोल इंजिनाची किंमत 7.25 लाख रुपये जेव्हा की झीटा आवृत्तीची किंमत 7.86 लाख रुपये आहे. कंपनीच्या मते, स्मार्ट हायब्रीड टेक्नॉलॉजीसह सुसज्ज बॅलेनो 23.87 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देईल.
 
मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटिंग व सेल्स) आरएस कलासी यांनी सांगितले की, 'मारुती सुझुकी आपल्या उत्पादनांमध्ये नवीन, चांगले आणि पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञान आणण्याचे प्रयत्न करते. स्मार्ट हायब्रीडसह बीएस 6 तंत्रज्ञान असलेली बॅलेनो याचाच पुरावा आहे. आम्हाला विश्वास आहे की Baleno ग्राहकांच्या आकांक्षा अनुरूप एक संपूर्ण पॅकेज असेल.'
 
कंपनीने सांगितले की बॅलेनो ही देशाची पहिली प्रिमियम हॅचबॅक कार आहे, ज्यात स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञान दिलेले आहे. 2015 मध्ये बॅलेनो सादर केल्यापासून मारुती आतापर्यंत 5.5 लाखापेक्षा जास्त युनिट्सची विक्री झालेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन वैशिष्ट्यांसह Honda Amaze लॉन्च, किंमत 8.56 लाख रुपये