म्हाडाची 9 हजार घरांची लॉटरी दसऱ्याला काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
या लॉटरीत पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत 6500 घरं, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत 2 हजार घरं आणि 20 टक्के योजनेअंतर्गत येणाऱ्या 500 घरांचा समावेश आहे. कोरोना काळात म्हाडाची लॉटरी प्रलंबित होती. साधारण दोन वर्षांनंतर म्हाडाने लॉटरीची घोषणा केली आहे.
ही घरं ठाणे, वर्तकनगर, मीरारोड, कल्याण, वडवली, गोथेघर, विरार बोळींज नाका याठिकाणी उपलब्ध होणार आहेत. एकूण 9 हजार घरं असून निम्न आणि मध्यमवर्गीयांसाठी असणार आहेत.