अमूलनंतर मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये फुल क्रीम दूध आणि गायीच्या दुधाच्या दरात वाढ केली आहे. मदर डेअरीने लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. मदर डेअरीच्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितले की, आम्ही फक्त फुल क्रीम आणि गायीच्या दुधाच्या किमती 2 रुपये प्रति लिटरने सुधारत आहोत. ही दरवाढ 16 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता अमूलचे फुल क्रीम दूध ६२ ऐवजी ६४ रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे. त्याचवेळी मदर डेअरीनेही दरात वाढ करण्याची तयारी केली आहे. मदर डेअरी संध्याकाळपर्यंत नवीन किंमत जाहीर करू शकते.
अमूलच्या फुल क्रीम दुधाच्या वाढलेल्या किमतीबाबत, आर एस सोढी, एमडी, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लि. यांनी सांगितले की, अमूलने गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये फुल क्रीम दूध आणि म्हशीच्या दुधाच्या किमती 2 रुपयांनी वाढवल्या आहेत.