Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना अंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना अंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी
, मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (07:09 IST)
आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतंर्गत सर्वाधिक लाभार्थी  राज्य म्हणून महाराष्ट्र अव्वलस्थानी असल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत दिली.
 
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (एबीआरवाय) अंतर्गत कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जांनुसार महाराष्ट्रातून एबीआरवाय मधून सर्वाधिक लाभ घेतला असल्याचे श्री. तेली यांनी सांगितले. महाराष्ट्रातील एकूण 17,524 कंपन्यांमधील 6,49,560 कर्मचाऱ्यांनी 4,09,72,34,366 इतकी रकम वर्ष 2019-20 ते आर्थिक वर्ष 2021-22 या कालावधीत उचलली आहे.  महाराष्ट्र पाठोपाठ गुजरात, कर्नाटक या राज्यातील कामगारांनी रकम उचलली आहे.
 
केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) दाव्यांच्या निपटाऱ्यांची प्रक्रिया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) जानेवारी 2020 मध्ये सुरु केली होती.
महामारी, पूर, भूकंप इत्यादी आपत्तीच्या वेळी इपीएफ सदस्यांना अखंड सेवा देण्यासाठी इपीएफओ मध्ये मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सुविधा सुरू करण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे ईपीएफ सदस्यांना अखंड सेवा पुरवण्यात मदत झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

India Tour of South Africa : उपकर्णधार रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर, या खेळाडूने घेतली 'हिटमॅन'ची जागा