Publish Date: Fri, 21 Oct 2016 (14:39 IST)
Updated Date: Fri, 21 Oct 2016 (14:41 IST)
फोर्ब्ज इंडियाने भारतातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात उद्योगपती मुकेश अंबानी सलग ९ व्या वर्षी क्रमांक एकचे अब्जाधिश ठरले आहेत. या अहवालानुसार मुकेश यांची संपत्ती झपाट्याने वाढत असून सध्या एकूण संपत्ती २२.७ अब्ज डॉलर इतकी आहे. म्हणजेच सुमारे १४७२ अब्ज रुपये इतकी आहे. फोर्ब्जच्या या यादीत सन फार्माचे दिलीप संघवी दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती १६.९ अब्ज डॉलर इतकी आहे. १५.२ अब्ज डॉलर संपत्ती असलेला हिंदुजा परिवार तिसऱ्या स्थानी, तर विप्रोचे अजीम प्रेमजी १५ अब्ज डॉलर संपत्तीसह चौथ्या स्थानी आहेत.