रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी चीनच्या हुई का यान यांना पाठिमागे टाकले आहे. फोर्ब्सने रियल टाईम बिलियनर्सच्या लिस्टनुसार ४२.१ अरब डॉलर म्हणजेच २,७१७ कोटी रूपये इतकी संपत्ती असलेल्या हुई का यान हे अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र, बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १.२२ टक्क्यांचा फायदा होऊन तो ९५२.३० कोटी रूपयांवर पोहोचला त्यामुळे अंबानी यांची संपत्ती ४६६ मिलियन डॉलरवर पोहोचली.
दरम्यान, चीनच्या एव्हरग्रॅंण्ड ग्रुपचे चेअरमन हुई का यान यांची संपत्ती १,२८ बिलियन डॉलरवरून घटून ती ४०.०६ अरब डॉलरवर पोहोचली आहे. सद्या जगभराचा विचार करता श्रीमंतांच्या यादीत अंबानी १४व्या स्थानावर आहेत.