Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mumbai: मुंबईत घर विकत घेणे झाले महाग!

Mumbai: मुंबईत घर विकत घेणे झाले महाग!
ठाणे , गुरूवार, 18 मे 2017 (09:21 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून हजार आणि ५00 च्या नोटा रद्द केल्यापासून मालमत्तांच्या खेरदी-विक्रीचा व्यवसाय जवळपास ठप्प आहे. दुसरीकडे या व्यवसायातील काळ्या पैशावर निर्बंध येऊन वाढवलेले दर किमान २५ टक्के खाली येतील आणि रियल इस्टेट व्यवसायाला चांगले दिवस येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती; परंतु रेडीरेकनरच्या दरात झालेली वाढ, कन्व्हेयन्स डीड फीमध्ये वाढवलेले दर आणि जुलैपासून लागू होणारी जीएसटी कर प्रणाली यामुळे मालमत्तांचे दर कमी होण्याऐवजी मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता असून घर खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार हे उघड होऊ लागले आहे.मालमत्तांचे दर कमी होण्याची शक्यता झाली धुसर?नवी दिल्ली : केवळ मुंबईतच नव्हे, तर जगभरातील प्रमुख शहरांमधील आलिशान घरांच्या किमतीत वेगाने वाढ होत आहे. नाईट अँड फ्रँक संस्थेने केलेल्या याबाबतच्या सर्वेक्षणानुसार ४१ शहरांमध्ये आलिशान घरांच्या दरवाढीत मुंबईचा २४ वा क्रमांक लागला आहे. मार्च महिन्यात संपलेल्या २0१६-१७ आर्थिक वर्षात मुंबईतील अलिशान घरांच्या किमतीत १.१ टक्का वाढ झाली असल्याचे या सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निकाल