Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या यांचा नमामि गोदा प्रोजेक्टमध्ये समावेश

nashik mahapalika
, शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (14:39 IST)
नाशिक :- निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेकडे नंदिनी नदीचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपूर्वी केली होती.
 
त्याविषयी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यसचिव भूषण गगरानी यांच्याकडे यविषयी तक्रार करण्यात आली होतो, मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेत नाशिक महानगर पालिका आयुक्त यांना यविषयी त्वरित कारवाई करुण उत्तर देण्यास सांगितले होते.
 
त्या अनुशांगाने आज निसर्गसेवक युवा मंच संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांना कारवाई बाबत पत्र प्राप्त झाले असून यात प्रमुख दोन मागण्या मान्य झाल्या आहेत. नंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्यांचा नमामि गोदा प्रकल्पत समावेश करण्यात आला आहे. यात सांडपाणी अड़वणे, वळवणे, क्षमते नुसार मलनिसारण केंद्र बांधणे, नद्यांचा किनारा विकासित करणे, घाट बांधणे, गयाबलियान वॉल बांधणे आदि प्रमुख कामे यात घेण्यात आले आहे. त्याचप्रमाने नंदिनी नदीसह गोदावरी व तिच्या सर्व उपनद्या यांच्या पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक महानगरपालिका यांना सांगण्यात आले आहे.
 
त्यामुळे लवकरच नंदिनी नदीसह गोदावरी व तिच्या उपनद्या यांच्या पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात येतील. खुप दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मागण्या मान्य झाल्यामुळे सर्व नदी प्रेमी व पर्यावरण प्रेमी यांनी आनंद झाला आहे. यामुळे नंदिनी नदी व गोदावरी सह तिच्या उपनद्या प्रदुषण मुक्त होण्यास मदत होणार आहे असे मत श्री अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…