दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओला दणका दिला आहे. प्राइम मेंबरशिप घेण्यासाठी जिओने दिलेली 15 दिवसांसाची वाढीव मुदत मागे घेण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत.
यासोबतच समर सरप्राइज ऑफरदेखील मागे घेण्यास सांगितलं आहे. जिओच्या सर्व ग्राहकांना दररोज 1 GB मोफत डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. 31 मार्च 2017 ही या ऑफरची अंतिम तारीख होती. मात्र रिलायन्सने पुन्हा ही तारीख 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली.