फेब्रुवारीमध्ये नोकिया 3310 हा सर्वाधिक लोकप्रिय फोन पुन्हा रिलॉन्च केला. भारतासह अनेक देशांमध्ये या फोनची प्रतिक्षा आहे. भारतात या फोनची किंमत साडे तीन हजार रुपये आहे. मात्र रशियामध्ये हा फोन यूनिक पद्धतीत मिळणार आहे. रशियाची प्रिमियम स्मार्टफोन मेकर कंपनी ‘कॅव्हियर’ने नोकिया 3310 चं रिस्टाईल व्हर्जन तयार केलं आहे. या मॉडेलचं नाव नोकिया 3310 सुप्रीमो पुतिन असं आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोसह हा फोन बनला असून फोनवर रशियाच्या राष्ट्रगीताची एक ओळही लिहिण्यात आली आहे. या फोनची किंमत तब्बल 1 लाख 13 हजार 200 रुपये ठेवण्यात आली आहे.नोकियाचा रशियामधील हा फोन ड्युअल गोल्ड कोटेड आणि ड्युअल इलेट्रोप्लेटेड टेक्नोलॉजीसह येणार आहे.
नोकिया 3310 मध्ये 2.4 इंचाची कव्हर्ड स्क्रीन आणि बटन असलेला की-बोर्ड असणार आहे. 2 मेगापिक्सलचा फ्लॅश लाईट कॅमेरा, हेडफोन, ड्युअल सिम, एफएम रेडियो, 16 एमबी इंटरनल स्टोरेज क्षमता जी 32 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या मोबाईलची बॅटरी 1200 mAh क्षमतेची आहे.