आता केंद्र सरकारने घरो-घरी सिलिंडर मिळावा या साठी काही योजना राबविल्या आहेत. या अंतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्जवला योजना सुरु केली असून या अंतर्गत सरकारी एपीएल आणि बीपील कार्डधारकांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाते. या अंतर्गत पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाकडून आता पर्यंत तब्बल 9 कोटींहून अधिक मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले आहे. या योजनेचा उद्देश्य ग्रामीण भागातील महिलांना लाकडाच्या धुरापासून सुटका देणं आणि स्वच्छ इंधन पुरवणे आहे. या योजने अंतर्गत केंद्र सरकार कडून सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी 12 सिलिंडरवर दिली जाते.
उज्ज्वला योजना साठी पात्रता-
या योजनेसाठी महिलांनाच अर्ज करता येऊ शकते.
ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थीच अर्ज करू शकणार.
अर्ज करणाऱ्यांच्या घरात कोणतेही दुसरे एलपीजी कनेक्शन नसावे.
आवश्यक कागदपत्रे-
अर्ज करण्यासाठी आधारकार्ड, पासपोर्टआकाराचा फोटो, रेशन कार्ड, बँक पासबुक लागणार.