कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला 30 जून 2017 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. याबाबत कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री( स्वतंत्र कार्यभार) निर्मला सितारामन यांच्याकडे 29 तारखेला पत्रव्यवहार करुन कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने या योजनेस मुदतवाढ दिल्याने राज्यातील कांदा उत्पादक व निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला बाजार मिळविणे व इतर देशांना स्पर्धा करणे शक्य होणार आहे.