rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांदा उत्पादकांसाठी अतिरिक्त रेल्वे रेक उपलब्ध

onion business
, सोमवार, 20 फेब्रुवारी 2017 (14:55 IST)
कांदा उत्पादकांसाठी अतिरिक्त रेल्वे रेक उपलब्ध करुन देण्याची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मान्य केली आहे. नाशिकच्या कांदा उत्पादकांना रेल्वेतर्फे सोमवारपासून दररोज आणखी एक रेक उपलब्ध करून दिला जाणार आहे. सध्या दररोज चार रेक दिल्या जात असून, आणखी रेक वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. यंदा कांद्याचं भरघोस पीक आलं असून, त्याची वाहतूक करण्यासाठी अधिक रेल्वे रेक मिळण्याची मागणी कांदा उत्पादकांकडून करण्यात आली होती.या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. नाशिक जिल्ह्यातून कांदा पूर्व, उत्तर, ईशान्य आणि पूर्वेकडील किनारी भागात पाठवला जाणार आहे. त्यामुळे कांदा निर्यात करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांचे आदेशामुळे उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोणी म्हटले अमिताभला, गुजरातच्या गाढवांचा प्रचार करू नका