Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांदा आणखी रडवणार?

onion-prices
, शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (23:20 IST)

राज्यातील कांद्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या चाकण बाजार पेठेत कांद्याचा भाव वधारला आहे. बाजारात कांद्याची आवक कमी झाल्यानं चाकण घाऊक बाजारात कांद्याला प्रति क्विंटल 2 हजार ते 3 हजार 200 रुपये एवढा भाव मिळाला आहे. तर किरकोळ विक्रीत कांदा 32 रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे कांद्याचे हे दर  सर्व सामान्यांच्या डोळयात पाणी आणणार आहेत.

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळं कांद्याच्या लागवडी वाया गेल्या आहेत. अनेक ठिकाणी पावसाळ्यात साठवणूक करून ठेवललेले कांदे बाजारात आणले. पण त्याचवेळी नवीन कांदाही बाजारात आल्यानं जुन्या की कांद्याचा खप कमी होऊन नवीन कांद्याचा खप वाढला. सद्यस्थितीला बाजारात कांद्याचे भाव प्रति क्विंटल 4 हजार 500 रुपये इतका झाला आहे. तर गेल्याकाही महिन्यांपासून साठवण केलेल्या जुन्या कांद्याचे भाव घसरले असून कांद्याही खराब होऊ लागल्याचे दिसून आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराट कोहली आता कसोटी आणि वनडेचं कर्णधारपद सोडू शकतो, रवी शास्त्रींचं वक्तव्य