Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

करा ऑनलाईन शॉपिंग, सेल झाले सुरु

onlind shopping
, शुक्रवार, 13 जुलै 2018 (08:54 IST)
अमेझॉनने सुरु केलेल्या Amazon Prime Day Sale सोबत आता फ्लिपकार्टने सुद्धा ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. फिल्पकार्टने 16 ते 19 जुलैपर्यंत Big Shopping Daysनावाने सेलचे आयोजन केले आहे. या सेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॅटगरीतील प्रॉडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. यामध्ये मोबाइल शिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि टीव्ही यांसारख्या प्रॉडक्ट्सवर मोठी सूट मिळणार आहे. 'सेल हो तो ऐसी' अशी, कंपनीने या सेलला टॅगलाइन दिली आहे. दरम्यान, अॅमेझान कंपनीचा सेल 36 तासांसाठी आहे, तर फ्लिपकार्टचा सेल 80 तासांसाठी असणार आहे. 
 
फ्लिपकार्टने स्टेट बॅंक ऑफ इंडिया(SBI)शी भागीदारी केली आहे. SBIच्या क्रेडिट कार्डचा वापर करणा-या ग्राहकांना 10 टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय फिल्पकार्ट आपल्या ग्राहकांसाठी नो-कॉस्ट EMI च्या ऑप्शन देत आहे. फ्लिपकार्टने सेलमध्ये जवळपास 1500 हून अधिक स्मार्टफोन्सवर सूट देणार आहे. यामध्ये गुगल पिक्सल 2 (128 जीबी) स्मार्टफोन ग्राहकांना 42999 रुपयांना मिळणार आहे. याशिवाय Panasonic P95 या स्मार्टफोनला 3999 रुपये आणि  Honor 9i(4GB रॅम, 64 GB स्टोरेज) हा स्मार्टफोन 14999 रुपयांना विकण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पक्ष्यांचा खून करणारे हे झाड तुम्हाला माहीत आहे का?