Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑनलाईन महासेल बंपर महासेल होणार बंद, लवकरच निर्णय

ऑनलाईन महासेल बंपर महासेल होणार बंद, लवकरच निर्णय
, मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (08:48 IST)
तुम्ही ऑनलाईन खरेदी करता का ? मग ही बातमी तुमच्या साठी आहे. फार महत्वाची आहे. फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईट वरून लाखो लोक मोठ्या प्रमाणत ऑनलाईन खरेदी करत आहेत. मोबाईल ते कपडे चपला ते चष्मा असे सर्व खरेदी करत असतात. अशातच या कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या विविध सवलतीच्या ऑफर्स, महाबंपर सेल, मेगा सेल या गोष्टींमुळे ग्राहक ऑनलाईन शॉपिंगकडे अधिक आकर्षित होतात. त्यामुळे बाजारावर फार मोठा परिणाम होतो आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या या आकर्षक सवलतींमुळे आणि ‘सेल’मुळे यंदा दसरा-दिवाळीदरम्यान बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आणि आर्थिक धक्का बसला आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (सीएआयटी) नव्या आर्थिक धोरणाची अमंलबजावणी करावी, अशी सरकारकडे जोरदार मागणी केली असून अनेक व्यापारी त्यांच्या मागे उभे आहे. 
 
भविष्यात जर या धोरणाची अंमलबजावणी झाली तर अशाप्रकारे बाजारपेठेवर प्रभाव टाकणारे ‘बंपर सेल’ई-कॉमर्स कंपन्यांना बंद करावे लागणार आहे. थोडक्यात ई-कॉमर्स कंपन्यांकडून जारी करण्यात येणार ‘मेगा सेल’बंद होतील. ई-कॉमर्स साईट्सवरुन देण्यात येणाऱ्या या भरमसाट सवलतींवर प्रतिबंध केला जावा सोबतच हे थांबवावे असे मागणी अखिल भारतीय व्यापारी महासंघाकडून केली आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना या मागणीचा प्रस्ताव दिला असून, केंद्र सरकारने सचिवांचा गट स्थापन केला आहे. या गटाने ऑनलाईन व्यापार आणि त्याबाबतच्या धोरणांविषयी एक रफ मसुदाही तयार केला आहे. त्यामुळे येणारे दिवस कायदेशीर नक्कीच ऑनलाईन साठी योग्य नाहीत असे चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बालात्कार झाला नाही, साक्ष फिरवली मुलीला कोर्टाचा दणका