Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑक्टोबरमध्ये केवळ 8 दिवस उघडल्या राहतील बँका, लवकर उरकून घ्या कामं

ऑक्टोबरमध्ये केवळ 8 दिवस उघडल्या राहतील बँका, लवकर उरकून घ्या कामं
, बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (13:35 IST)
ऑक्टोबर मध्ये बॅंकांना सुट्ट्या -हा महिना संपायला आला आहे. आणि ऑक्टोबरचा संपूर्ण महिना सणांचा असतो. या महिन्यात एकामागून एक सण येतात. या मुळे ऑक्टोबर महिन्यात 21 दिवस बँका बंद राहतील. या महिन्यात असेही दिवस येतील जेव्हा बॅंका सलग बंद राहणार. अशा परिस्थितीत जर आपल्याला ऑक्टोबरमध्ये बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर सर्वप्रथम त्या दिवशी बँका उघडल्या जातील की नाही हे तपासा.
 
गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी आहे, ज्यामुळे देशाच्या विविध भागात बँका उघडल्या जाणार नाहीत. त्याचबरोबर 3 ऑक्टोबरला रविवारची सुट्टी असेल. सर्वपितृ मोक्ष किंवा महालय अमावस्येच्या निमित्ताने 6 ऑक्टोबर रोजी अगरतळा, बंगळुरू, कोलकाता येथे बँका बंद राहतील. महासप्तमी,महाअष्टमी आणि दसऱ्याच्या निमित्ताने बँक कर्मचाऱ्यांनाही ऑक्टोबरमध्ये सुट्टी असेल. ऑक्टोबर महिन्याची शेवटची सुट्टी 31 रोजी असेल.
 
बँका कधी बंद असणार संपूर्ण यादी पहा -
* 1 ऑक्टोबर -अर्धवार्षिक बँक खाते बंद केल्यामुळे गंगटोकमध्ये कामावर परिणाम होईल.
* 2 ऑक्टोबर-गांधी जयंतीनिमित्त अगरतळा ते तिरुअनंतपुरम पर्यंत बँका बंद राहतील.
* 3 ऑक्टोबर - रविवार सुट्टी.
* 6 ऑक्टोबर - आगरतळा, बंगळुरू, कोलकाता येथे महालय अमावस्येमुळे बँका बंद राहतील.
* 7 ऑक्टोबर -इम्फालमध्ये बँका उघडणार नाहीत.
* 9 ऑक्टोबर - शनिवारी सुट्टी असेल.
* 10 ऑक्टोबर - रविवार सुट्टी असेल.
* 12 ऑक्टोबर - महा सप्तमीमुळे बँका बंद राहतील.
* 13 ऑक्टोबर - महाअष्टमीमुळे आगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पटना, रांची येथे बँक कर्मचार्‍यांची सुट्टी असेल.
* 14 ऑक्टोबर - अगरतळा,बंगळुरू,चेन्नई,गंगटोक,गुवाहाटी,कानपूर,कोलकाता,रांची,लखनौ,पाटणा,रांची, शिलाँग,तिरुअनंतपुरम येथे महानवमीमुळे बँका बंद राहतील.
* 15 ऑक्टोबर- दसऱ्याच्या निमित्ताने अगरतळा,अहमदाबाद ते तिरुअनंतपुरम येथे बँका बंद राहतील. मात्र, या दिवशी इम्फाल आणि शिमलामध्ये बँका सुरु राहतील.
* 16 ऑक्टोबर - गंगटोकमध्ये दुर्गा पूजेची सुट्टी असेल.
* 17 ऑक्टोबर - रविवार सुट्टी असेल
* 18 ऑक्टोबर - गुवाहाटीमध्ये काटी बिहूची सुट्टी असेल.
* 19 ऑक्टोबर- अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इम्फाल, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथे ईद-ए-मिलाद मुळे बँका बंद राहतील
* 20 ऑक्टोबर - अगरतळा, बंगळुरू,चंदीगड,कोलकाता, शिमला येथे वाल्मिकी जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
* 22 ऑक्टोबर - जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल.
* 23 ऑक्टोबर - शनिवारी सुट्टी असेल.
*24 ऑक्टोबर - रविवार सुट्टी असेल.
* 26 ऑक्टोबर -परिग्रहण दिनामुळे जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका उघडणार नाहीत.
* 31 ऑक्टोबर - रविवार साप्ताहिक सुट्टी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bank Holidays October:ऑक्टोबर मध्ये बॅंका 21 दिवस बंद राहणार, कधी सुट्ट्या असणार जाणून घ्या