Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेटीएम मनीची म्युच्युअल फंड ग्राहकांसाठी नवी सुविधा

पेटीएम मनीची म्युच्युअल फंड ग्राहकांसाठी नवी सुविधा
~ एसआयपीची आत्ता नोंदणी करा, पैसे मागाहून द्या’ हे फीचरची सुरुवात ~
 
मुंबई: म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठीचा भारताचा सर्वात मोठा मंच पेटीएम मनी ने आज “एसआयपी ची नोंदणी आत्ता करा, पैसे मागाहून द्या” ही नवीन सुविधा आपल्या ग्राहकांसाठी सुरू करीत असल्याचे जाहीर केले. या नवीन फीचरमुळे सर्व गुंतवणूकदारांना आता हा पर्याय आहे की, तत्काळ पेमेंट करण्याव्यतिरिक्त पैसे मागाहून देण्याचा पर्याय निवडून आपल्या एसआयपी गुंतवणुकीची सुरुवात करू शकतात. हा पर्याय निवडणा-या, वापरकर्त्यांसाठी पेटीएम मनी त्या म्युच्युअल फंडसाठीचे पहिले पेमेंट यशस्वीरीत्या केल्यानंतर एसआयपी एएमसीकडे नोंदणीसाठी पाठवते.
 
पेटीएम मनीचे पूर्ण वेळ संचालक प्रवीण जाधव म्हणाले, “पेटीएम मनी आपल्या गुंतवणूकदारांना एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये पद्धतशीर गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देते आणि आम्हाला हे पाहून आनंद होतो की आमचे ७५% पेक्षा जास्त गुंतवणूकदार एसआयपीचा पर्याय निवडत आहेत. “एसआयपी ची नोंदणी आत्ता करा, पैसे मागाहून द्या” या फीचरमुळे असे गुंतवणूकदार ज्यांना एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याची इच्छा असते पण नोंदणीच्या वेळी पैशांची सवड नसते, ते आता मागाहून पैशाची सोय झाल्यानंतर पेमेंट करण्याचा पर्याय निवडू शकतात. आपल्या वापरकर्त्यांना एसआयपी व्यवस्थापनाचा उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी पेटीएम मनी या क्षेत्रात नवनवीन उपक्रम करतच राहील.”
 
ज्या गुंतवणूकदारांनी आपल्या एसआयपीसाठी ऑटो-पे सक्रिय केलेले आहे, त्यांची रक्कम ठराविक एसआयपी तारखेस आपोआप गुंतवली जाईल. तर, ज्या गुंतवणूकदारांनी युपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंटचा पर्याय मान्य केलेला असेल त्यांना ठराविक तारखांना त्यांच्या एसआयपीचे पेमेंट करण्याची आठवण दिली जाईल.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे येथे १५वे ‘महाटेक- २०१९’ हे व्यावसायिक प्रदर्शन