Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रेडिट कार्डमधून Paytm Walletमध्ये मनी लोड करणे झाले महाग

क्रेडिट कार्डमधून Paytm Walletमध्ये मनी लोड करणे झाले महाग
, शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (10:54 IST)
ग्रॉसरी स्टोर्समधून सामान भरण्यासाठी, पाणी-लाईट बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल-डिटीएच रिचार्ज, ऑनलाईन ऑर्डर (Order online) अशा अनेक गोष्टींसाठी पेटीएम वॉलेटचा (Paytm Wallet) वापर अनेक जण करतात. पण आता युजर्ससाठी पेटीएम महाग होणार आहे. आतापर्यंत क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये मनी लोड केल्यानंतर कोणताही चार्ज द्यावा लागत नव्हता. पण आता कंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
 
paytmbank.com/ratesCharges वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबर 2020 पासून एखाद्या युजरने पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्ड (Credit card) मधून मनी ऍड केल्यास, त्याला 2 टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. या 2 टक्के चार्जमध्ये जीएसचीचा समावेश असणार आहे. उदा. जर तुम्ही क्रेडिट कार्डने पेटीएम वॉलेटमध्ये 100 रुपये टाकले, तर तुमच्या क्रेडिट कार्डमधून 102 रुपयांचं पेमेंट करावं लागणार आहे. हा नियम आधी 9 ऑक्टोबरपासून लागू होणार होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2020: ख्रिस गेलच्या मैदानावर येताच त्याने षटकार मारून पंजाबचे नशीब बदलले