Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आता  इंधन दर शंभरीकडे वेगाने वाटचाल करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 30 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलने 86 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल- डिझेल महाराष्ट्रात आहे. यामध्येही अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे. अमरावतीत पेट्रोल 86.22 रुपये तर डिझेल 73.94 रुपये आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गात पेट्रोल 86.01 रुपये तर डिझेल 72.69 रुपये प्रति लिटर आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 85.93 रुपये तर डिझेल 73.73 रुपये आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 85 रुपये तर डिझेल 72 रुपये 66 रुपयांवर पोहोचलं आहे.
 
कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर मागील 8 दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लालू प्रसाद यादव उपचारासाठी मुंबईत