Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल इतके महाग

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल इतके महाग
, गुरूवार, 14 मार्च 2024 (15:12 IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आज देखील काही शहरांमध्ये पेट्रोल हे स्वस्थ आहे तर काही शहरांमध्ये पेट्रोल महाग असल्याचे पहायला मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारात काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती सतत बदलत आहे. आज सकाळीही इंधनाच्या दरात बदल झाला. डब्ल्यूटीआय क्रूड 0.21% वाढून $79.88 प्रति बॅरल होते. तर ब्रेंट क्रूड 0.21% वाढून $84.20 प्रति बॅरलवर पोहोचले. तसेच इंधनाचे दर कच्च्या तेलाच्या किमतीवरून ठरवले जातात. हाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेल जाहिर झालेल्या या किंमतीमध्ये गुजरातपेक्षा 9 रुपयांनी महाग आहे. राज्यातील इंधन दर आणि  गुजरातमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी तफावत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये पेट्रोल 96.81 रुपयांनी विकेले जाते तर  डिझेल 92.57 रुपयांनी विकले जाते. तर महाराष्ट्रात पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये आहे. आज महाराष्ट्रात डिझेलच्या दरात 40 पैशांनी आणि पेट्रोलच्या दरात 42 पैशांनी घट झाली आहे. तर पेट्रोल आणि डिझेल 21 पैशांनी उत्तर प्रदेशमध्ये स्वस्त झाले आहे. तसेच राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 17 पैशांनी घट झाली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये डिझेल आणि पेट्रोल दर कमी केले जात आहे. 
     
मुंबईमध्ये डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोल 106.31 रुपये  आहे., पुण्यामध्ये डिझेलचा दर 92.89 रुपये प्रतिलिटर आणि पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.38 रुपये आहे., नाशिकमध्ये डिझेलचा दर 93.07 रुपये प्रतिलिटर आणि पेट्रोल 106.57 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे., नागपुरमध्ये डिझेलचा दर 92.61 रुपये प्रतिलिटर आणि पेट्रोलचा दर 106.06 रुपये आहे., छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल 95.45 रुपये प्रतिलिटर आणि  पेट्रोल 108.75 रुपये दराने विकले जाते. रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. तसेच नविन दर जाहिर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. म्हणून डिझेल आणि पेट्रोल एवढ्या महागात खरेदी करावे लागत आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पाऊस झोडपणार