भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज 11 डिसेंबर रोजी जारी केलेल्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सर्व महानगरांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वाहनांच्या इंधनाच्या किमती सारख्याच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही 21 मे पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत आजही (रविवार) एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलचा दर 89.62 रुपये आहे.
आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. मात्र, तेल कंपन्यांनी दीर्घकाळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.