Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

Petrol Price Today: पेट्रोल 110 रुपये प्रति लीटरच्या अगदी जवळ आहे, जाणून घ्या कोणत्या शहरात डिझेल 100 पेक्षा जास्त आहे

Petrol Diesel
, गुरूवार, 24 जून 2021 (09:10 IST)
Petrol Diesel Price Today 24th June 2021: पेट्रोलच्या दरात आज 26 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 7 पैशांची वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्लीत पेट्रोल 97.76 रुपयांवर पोहोचले, तर डिझेलदेखील दिल्लीत 88.30 रुपये प्रतिलिटर झाले. महत्वाचे म्हणजे की बुधवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 75 च्या पुढे गेली. गेल्या दोन वर्षांत प्रथमच ब्रेन्ट क्रूडच्या किमतीने ही पातळी ओलांडली आहे.
 
4 मेपासून आतापर्यंत 30 दिवसांत डिझेलच्या दरात प्रति लीटर 7.5२ रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, त्याच दिवशी पेट्रोल 7.44 रुपये प्रतिलिटर महाग झाले आहे. आता राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाख या आठ राज्यात पेट्रोलचे किरकोळ भाव १०० रुपये प्रति लीटर ओलांडले आहेत. महानगर मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये पेट्रोलने यापूर्वीच प्रतिलिटर 100 रुपये ओलांडले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

McAfeeचे संस्थापक जॉन मॅकॅफीने आत्महत्या केली