Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाच शहरात रोज बदलणार पेट्रोल- डिझेलचे भाव

पाच शहरात रोज बदलणार पेट्रोल- डिझेलचे भाव
येत्या 1 मे पासून पेट्रोल, डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार दररोज बदलणार असून प्राथमिक स्तरावर देशातील पाच शहरात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. पुडुचेरी, उदयपूरल जमशेदरपूर, चंदीगड आणि आंध्र प्रदेशातील विझाग या शहरांमध्ये ही योजना राबवण्यात येणार असून ती यशस्वी ठरल्यास ती देशभरात लागू होईल.
 
सध्या देशात दर पंधरवड्याला पेट्रोल- डिझेलचे भाव बदलतात, मात्र सरकारी तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजाररभावानुसार दररोज पेट्रोल- डिझेलच्या भावात बदल करण्याच्या विचारात आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पोट्रोलियमचे देशातील 95 टक्के किरकोळ इंधन बाजारावर वर्चस्व आहे. या कंपन्या हे दररोजचे दर ठरवण्यासाठी कोणत्या प्रक्रिया राबवण्यात येतील, त्याचा अभ्यास करत आहेत.
 
पेट्रोल- डिझलचे दररोजचे दर कसे ठरवायचे याबाबत चर्चा करण्यासाठी या कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी नुकतीच पेट्रोलियम मंत्रालयाचा अन्य अधिकार्‍यांची भेट घेतली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुस्लीम नव्हे तर गुंडांचा राम मंदिरास विरोध: भागवत