Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग झाले, विमानाच्या इंधनाचे दर कमी झाले

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग झाले, विमानाच्या इंधनाचे दर कमी झाले
, मंगळवार, 1 जून 2021 (10:38 IST)
एकीकडे देशात कोरोनाचा कहर सुरु असतांना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भाववाढ होत आहे. आज सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. आज डिझेलची किंमत 23 ते 24 पैशांनी वाढली आहे, तर पेट्रोलची किंमतही 25 ते 26 पैसे झाली आहे. दरम्यान, विमानचालन इंधन 1 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.
 
आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 94.49 रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर 85.38 रुपये आहे तर मुंबईत पेट्रोलची किंमत 100.72 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.69 रुपये प्रति लिटर आहे.
 
चार महानगरांमध्ये किंमत किती आहे ते जाणून घ्या…
दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे आज एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत.
दिल्ली : डीझेल 85.38, पेट्रोल 94.49 
मुंबई : डीझेल 92.69, पेट्रोल 100.72
कोलकाता : डीझेल 88.23, पेट्रोल 94.50
चेन्नई : डीझेल 90.12, पेट्रोल 95.99
 
तर सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
 
विमान इंधन एक टक्का स्वस्त: विमानाच्या इंधनाच्या किंमती आजपासून सुमारे एक टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विमान कंपन्यांना थोडा दिलासा मिळेल.
 
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळाच्या माहितीनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीत विमानाच्या इंधनाची किंमत आजपासून 64,118.41 रुपये प्रति किलोलीटरवर गेली आहे. पूर्वी हे प्रति किलोलिटर 64,770.53 रुपये होते. तर, ते 652.22 रुपयांनी स्वस्त झाले आहे, म्हणजेच 1.01 टक्के.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काशी विश्वनाथ धाममध्ये मोठा अपघात, 2 मजली घर कोसळल्याने 2 मजुरांचा मृत्यू