Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता पेट्रोल पंप रविवारी बंद

आता पेट्रोल पंप रविवारी बंद
कमिशन वाढवून देण्याबद्दल सरकारकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पेट्रोल पंप मालकांनी रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची धमकी दिली आहे. सध्याच्या घडीला पेट्रोल पंपांकडून कोणतीही सुटी घेतली जात नाही. मात्र केंद्र सरकारकडून कमिशन वाढवून दिले जात नसल्याने रविवारी साप्ताहिक सुटी घेण्याच्या इशारा देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे.
 
10 में हा दिवस नो पर्चेस डे असेल, असा इशारा देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे. त्यामुळे या दिवशी पेट्रोलशी खरेदी केली जाणार नाही, असे पेट्रोल पंप मालकांनी म्हटल्याचे वृत्त आहे. पीएसयू संस्थांकडून मिळणार्‍या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी जानेवारी महिन्यातच पेट्रोल पंप मालकांकडून करण्यात आली होती.
 
कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, कमिशन वाढवून देण्याबद्दलचे आश्वासान केंद्राकडून देण्यात आल्यानंतर पेट्रोल पंप मालकांकड़न संप मागे घेण्यात आला. मात्र त्यानंतर अद्यापही पेट्रोल पंप मालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.
 
कमिशनमध्ये वाढ न केल्यास १० मे रोजी पेट्रोल आणि डिझेलची खरेदी केली जाणार नाही, असा इशारा पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे. १० मे रोजी पेट्रोल पंप मालकांनी इंधन खरेदी न केल्सास त्याची झळ सर्वसामान्यांना १४ मे रोजी बसेल. १४ मे रोजी रविवार असल्याने पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येईल आणि यानंतरच्या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद असतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिंध हा भारताचा भाग नाही याचे वाईट वाटते: अडवाणी