Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता चेक बाउन्स झाल्यास होणार कठोर शिक्षा

आता चेक बाउन्स झाल्यास होणार कठोर शिक्षा
नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच चेक बाउन्स होण्याच्या कायद्यामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार चेक बाउन्स प्रकरणी कठोर कायदा अमलात आणू शकते.
 
व्यापार्‍यांना एका संघटनेद्वारे सरकाराला अशाप्रकारचा सल्ला देण्यात आला आहे. बजेट तयार होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या मोठ्या अधिकार्‍यांच्या भेटी ही संघटना घेत असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. चेक बाउन्स होण्याच्या घटनांमुळे अनेक व्यापारी ग्राहकांकडून चेक घेण्यास काचकुच करतात. त्यामुळे बाउन्स प्रकरणी कठोर कायदा तयार करण्यात यावा अशी या व्यापार्‍यांची मागणी आहे. चेक बाउन्स प्रकरणी संबंधित व्यक्तीला एका महिन्याच्या आत तुरुंगात पाठवावे अशी सूचना संघटनेने केल्याचे वृत्त आहे.
 
संबंधीतला तुरुंगात पाठवण्याच्या शिक्षेसाठी सरकार तयार आहे की नाही हे नक्की नसले तरी, या प्रकरणी कायदा कठोर करण्याबाबत सरकार विचार करू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेल्फी काढून तरुणाची रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या