Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
, गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (10:06 IST)
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप करत नाही. हा खर्च करण्यास केंद्र सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे.
केंद्र सरकार अशी भूमिका का घेत आहे, अनेक जण केंद्र सरकारवर अवलंबून असल्याने त्यांची निराशा होत आहे, असंही रघुराम राजन म्हणाले.
सध्या राज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. केंद्रीय उपकराच्या माध्यमातून केंद्र सरकारने महसुलातील मोठा वाटा आपल्याकडेच ठेवला.
संपूर्ण देश एककेंद्री सत्तेतून हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आहे. पण अति केंद्रीकरणामुळे आपल्या आर्थिक प्रगतीच्या मार्गात अडथळा येत आहे," असं मत राजन यांनी व्यक्त केलं.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय