काही लोकांनाच रेल्वेचे तिकीट अर्ध्या किमतीत मिळणार आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी, म्युनिसिपल कॉरपोरेशन,सरकारी नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणारा विद्यार्थी असेल, अशा सर्व लोकांना रेल्वे तिकीटात ५० टक्के सूट सवलत देणार आहे. ही सवलत फक्त स्लिपर आणि जनरल डब्ब्यातून प्रवास करताना मिळणार आहे. याशिवाय एखादी व्यक्ती मानव उत्थान सेवा समितीच्या नॅशनल इंटीग्रेशन कॅम्पमध्ये सहभाग घेण्यासाठी जाणार असेल, त्या व्यक्तीस रेल्वेचे तिकीटावर ४० टक्के सूट मिळणार आहे.
आईआरसीटीसी (IRCTC)वेगवेगळ्या शहरांसाठी रेल्वे प्रवाशांना नवीन पॅकेज देत असते. हे पॅकेज रेल्वे प्रवाशांना परवडण्यासारखे आहे. यामध्ये दिल्ली ते केरळ यात्रा करणार्या प्रवाशांना खास सवलत दिली जाणार आहे.